महुडे, ता. भोर : वडतुंबी येथे महिलांसाठी 'बांबू गुढीनिर्मिती' या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे, प्रबोध बांबू सेतू स्वयंरोजगार व उद्योजकता विकास प्रकल्प, प्रबोध ग्रुप व रतिलाल भगवानदास जैवतंत्रज्ञान विभाग ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्यशाळेत पर्यावरण पूरक बांबू गुढी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.त्यातून महिलांना रोज़गार उपलब्ध करून देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अॅग्रोवन १८.३.२५