बगदाद-: इराक आणि अमेरिकी लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत 'आयसीस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू खादिजा ठार झाला आहे. इराकचे पंतप्रधान मोहंमद शिया अल-सुदानी यांनी याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हा कारवाई करण्यात आली.
अबू खादिजा हा इराक आणि जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक होता असे त्यांनी समाजमाध्यमांवर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ही लष्करी कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली होती पण खादिजाच्या मृत्यूला दुजोरा मात्र शुक्रवारी देण्यात आला. सध्या सीरियाचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी हे इराकच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांनी आयसिसचा पाडाव करण्याचा निर्धार केला आहे.
आयसीस ही दहशतवादी संघटना भारतातसुद्धा विध्वंसक कारवाया करीत असते.
मुंबई तरूण भारत १६.३.२५