हिंदू धर्मगुरूंच्या विरोधात डाव्यांचे नियोजित षडयंत्र

17 Mar 2025 17:00:00


Hindu Sanskruti17.03.2025 

ब्रिटिश राजवटीपासूनच हिंदू धर्मगुरूंविरुद्ध एक ठोस प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. पारंपरिक गुरुकुल प्रणाली मोडीत काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय आध्यात्मिक व्यवस्थेला अंधश्रद्धा आणि प्रतिगामी म्हणून सादर केले. स्वातंत्र्यानंतरही, नेहरू आणि काँग्रेस सरकारने डाव्या विचारसरणीला चालना दिली. परिणामी, मार्क्सवादी विचारवंतांनी शिक्षण, माध्यमे (मीडिया) व साहित्य क्षेत्रांवर प्रभाव मिळवला, आणि हिंदू परंपरांबाबत नकारात्मक दृष्टिकोन रूजवण्याचे काम केले.आजच्या काळात, डाव्या विचारवंतांनी हिंदू आध्यात्मिक गुरूंना बदनाम करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवली आहे. माध्यमांच्या मदतीने सातत्याने हिंदू धर्मगुरूंबद्दल नकारात्मक बातम्या आणि आरोप पसरवले जातात. न्यायसंस्थेतही विशिष्ट विचारधारेशी संबंधित असलेल्या वकिलांकडून हिंदू गुरूंच्या विरोधात खटले दाखल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
 

सांस्कृतिक युद्ध आणि हिंदू परंपरांचा ऱ्हास 

 डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली, भारतीय सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण संस्थांमध्ये हिंदू धर्म आणि परंपरांविषयी विकृत माहिती पसरवली जाते. चित्रपट, साहित्य आणि अकादमिक अभ्यासक्रमांमध्ये हिंदू धर्मगुरूंच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतो. याउलट, इतर धर्मगुरूंना प्रतिष्ठा आणि संरक्षण दिले जाते.पुढील काही मुद्द्यांच्या माध्यमातून हिंदू धर्मगुरू आणि हिंदू संस्कृती वर लक्ष करण्यात येत आहे.
 

प्रसार माध्यमांची भूमिका

हिंदू धर्मगुरूंच्या बाबतीत माध्यमे कठोर भूमिका घेतात, तर इतर धर्मीय नेत्यांच्या बाबतीत सौम्य भूमिका घेतली जाते. उदाहरणार्थ, हिंदू साधूंवर आरोप झाले की मोठ्या प्रमाणावर कव्हरेज दिले जाते, पण इतर धर्मीय गुन्हेगारांसाठी तितकीच कठोर भूमिका घेतली जात नाही. "भगव्या दहशतवाद" (Saffron Terror) सारखी संकल्पना उभी करून हिंदू संत, साधू आणि राष्ट्रवादी शक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच अनेक हिंदी चित्रपट, ओ. टी. टी वरील वेब सिरीजमधून हिंदू गुरुंना आणि हिंदू संस्कृतीला नकारात्मक पद्धतीने दाखवले जाते. उदा. रे, ओ एम जी,आश्रम यांसारख्या वेब सिरीजमध्ये हिंदू साधूंना भ्रष्ट आणि गुन्हेगार म्हणून दाखवले जाते.पुरोगामी आणि डाव्यांच्या मोहिमाअनेक पुरोगामी आणि डावे विचारवंत हिंदू धर्मगुरूंना "अंधश्रद्धा", "जातिवादाचे समर्थक" किंवा "महिला विरोधी" म्हणून सादर करतात. काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणि एनजीओ हिंदू गुरूंविरोधात चळवळी चालवतात, पण इतर धर्मातील कर्मठतेविरोधात मात्र ते गप्प राहतात. ‘काळी शक्ती’, ‘बाबा संस्‍कृती’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाखाली हिंदू गुरूंना लक्ष्य केले जाते.
 

विदेशी निधी आणि धर्मांतर मोहिमा

चर्च आणि इस्लामिक संस्थांकडून हिंदू धर्माच्या प्रभावाला कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी निधी दिला जातो. हिंदू धर्मगुरू मोठ्या प्रमाणावर लोकांना संघटित करतात आणि धर्मांतराच्या विरोधात उभे राहतात, त्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जाते.धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांवर सरकारी हस्तक्षेपसरकारे अनेकदा हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन स्वतःच्या हातात घेतात, मात्र इतर धर्मीय प्रार्थनास्थळांवर असा हस्तक्षेप नसतो. दक्षिण भारतात हजारो मंदिरांचे उत्पन्न सरकारकडे जाते, पण चर्च आणि मशिदी यांचे उत्पन्न स्वतंत्रपणे वापरण्याची मुभा आहे.यामुळे हिंदू मंदिर व्यवस्थापन दुर्बल होत आहे, आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 

राष्ट्रीयता आणि सनातनचा संबंध तोडण्याचे षडयंत्र

हिंदू धर्म हा भारतीय संस्कृतीचा मुख्य आधारस्तंभ आहे, आणि अनेक संत आणि गुरूंनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले.मात्र,आज या गुरूंना "संस्कृतीविरोधी", "जातीयवादी", किंवा "गैरव्यवहार करणारे" म्हणून सादर करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती यांसारख्या विचारवंतांना दुर्लक्षित करून केवळ आधुनिक, पाश्चिमात्य विचारसरणीला महत्त्व दिले जात आहे.हिंदू संत आणि गुरुंना "फसवे" आणि "अंधश्रद्धा पसरवणारे" म्हणून रंगवले जाते.पण इतर धर्मगुरूंवर अशी टीका केली जात नाही. रामदेव बाबा यांचे पतंजलीच्या माध्यमातून हिंदू योग परंपरा आणि आयुर्वेद या संकल्पनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे महत्त्वाचे योगदान आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी देखील पर्यावरण आणि योग या क्षेत्रात ईशा फौंडेशनच्या माध्यमातून जगभरातील लोकांमध्ये भारतीय संस्कृतीचे महत्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. मात्र पुरोगामी आणि डाव्या विचारवंतांकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असून हिंदू संस्कृती आणि साधू यांना लक्ष करण्यात येत आहे. हिंदू आध्यात्मिक गुरूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर लढा देण्याची नवी चळवळ उभी करणे आवश्यक आहे.या व्यापक षडयंत्राचा प्रतिकार करण्यासाठी हिंदू समाजाने बौद्धिक आणि सांस्कृतिक पातळीवर सजग होण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्मगुरूंनी केवळ आध्यात्मिक नेतृत्वच नव्हे, तर समाज सुधारणेतील योगदान लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता आहे.
 
 

वायुवेग १५.३.२५

Powered By Sangraha 9.0