यवतमाळः यवतमाळची १८ वर्षीय तरुणी शौर्या गोविंद बजाज हिने अत्यंत कठीण समजले जाणारे लेह-लडाख भागातील माऊंट कायगर-री शिखर ६,१७६ मीटरची चढाई करीत सर केले. यामुळे गिर्यारोहणाच्या इतिहासात शौर्याच्या नावाची नोंद झाली आहे. महिला क्षेत्रातील तिची ही कामगिरी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे, तापमानाचा पारा उणे ३७ सेल्सिअसपर्यंत खाली असताना प्रचंड थंडी आणि सतत वाहणाऱ्या हिमवाऱ्यामध्ये तिने ही कामगिरी यशस्वी केली. कमी वयात हे शिखर सर केल्याचा विक्रम तिच्या नावे नोंदविला गेला.
लोकमत ३.१.२४