माहीत असावं असं काही

26 Feb 2025 10:36:53
 
महाशिवरात्रीचं आगळं महत्व 
माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला 'महाशिवरात्र' म्हणतात याचं कारण या दिवशी निसर्ग तुमच्यासाठी अधिक जवळ आलेला असतो. या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की त्यांच्याकडून मिळणारी उर्जा विशेषतः पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अधिक मिळू शकते. आणि ही उर्जा एखाद्या व्यक्तीला वरच्या दिशेने नेणे सोपे ठरते. 
यासाठी आवश्यक गोष्ट अशी की त्या दिवशी व्यक्तीने उभ्या स्थितीत राहणे आवश्यक आहे असे सांगितले जाते.
शिवाला नेहमी त्र्यंबक म्हणून संबोधले जाते. याचा अर्थ त्याला तिसरा डोळा असतो. आपल्या नेहमीच्या दोन डोळ्यांखेरीज हा तिसरा डोळा जो ज्ञानाचा डोळा, सखोल भेद करणारा डोळा जो आपलाही उघडला गेला पाहिजे, त्याकरिता एक नवीन दृष्टी प्राप्त व्हायला हवी. जे काम महाशिवरात्रीच्या दिवशी होऊ शकते.  
आपली परंपरा किंवा अध्यात्म सांगते की पुस्तकं वाचणे, कुणाची भाषणं, प्रवचन ऐकणे, माहिती गोळा करणे म्हणजे ज्ञान मिळवणे नव्हे तर ज्ञान म्हणजे आपली संवेदनशीलता, आपली विवेकबुद्धी जागृत करणे, आपली सारासार बुद्धी जागृत ठेवणे असा होतो. हे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारी उर्जा मिळवण्याचा हा दिवस, म्हणून याचे महत्त्व आहे.     
सकाळ २५/२/२५ 
Powered By Sangraha 9.0