दिवसभरात दोनदा नाहीसे होणारे शिवमंदिर

SV    26-Sep-2024
Total Views |
 
 देशभरात शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांचा स्वतःचा पौराणिक इतिहास आहे. तुम्ही १२ ज्योतिर्लिंगांबद्दल अनेकदा ऐकले असेल, पण तुम्ही कधी भगवान भोलेनाथच्या मंदिराबद्दल ऐकले आहे का, जे दिवसा गायब होते. एवढेच नाही तर या मंदिरात स्थापन केलेल्या शिवलिंगावर समुद्राच्या लाटा स्वतः जलाभिषेक  करतात. या मंदिराची ही खासियत नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहते त्यामुळे लाखो भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. या मंदिराच्या गायब होण्यामागील रहस्य जाणून घेऊया.
मंदिरच नाहीसे होते : स्तंभेश्वर महादेव मंदिर गुजरातच्या भरूच जिल्ह्यात समुद्र किनारी आहे. ते दिवसातून दोनदा आपल्या जागेवरून गायब होते, त्यामुळे या अनोख्या मंदिराला 'गायब झालेले' मंदिर असेही म्हणतात. वास्तविक, मंदिर नाहीसे होण्यामागे कोणताही चमत्कार नसून निसर्गाची एक सुंदर घटना आहे. या मंदिराचा शोध सुमारे २०० वर्षांपूर्वी लागला होता.
हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे समुद्रात भरती आल्यावर संपूर्ण मंदिर समुद्रात बुडून जाते. समुद्राला ओहोटी आल्यावरच  लोक या मंदिरात देवाचे दर्शन घेतात. ही  नैसर्गिक क्रिया शतकानुशतके सुरु आहे. भरतीच्या वेळी पाण्याच्या लाटा उसळत असताना मंदिरात महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करतात. ही घटना दररोज सकाळी आणि संध्याकाळी घडते.
मंदिराची आख्यायिका : या मंदिराच्या बांधकामाची कथा स्कंदपुराणात वर्णन केलेली आहे. असे म्हणतात की तारकासुराने भगवान महादेवाची कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसाला वर मागण्यास सांगितले. 'भगवान भोलेनाथांचा  फक्त सहा महिन्यांचा मुलगा त्या राक्षसाचा वध करू शकेल' असा वर राक्षसाने मिळवला.
भगवान शंकराकडून वरदान मिळताच तारकासुरने सर्वत्र दहशत पसरवली आणि सर्व देवदेवता आणि ऋषींना त्रास दिला. त्रासलेले सर्व देव आणि ऋषी महादेवाकडे पोहोचले आणि त्यांनी त्याला  सर्व काही सांगितले, त्यानंतर कार्तिकेयाने तारकासुराचा वध अवघ्या सहा दिवसांचा असताना केला.
टीव्ही नाईन ३.२.२४