पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकला !

SV    06-Jul-2024
Total Views |
 

मुझफ्फराबाद - पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक जनतेने पाकिस्तानच्या अत्याचारांच्या विरोधात उठाव चालू केल्यामुळे तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १०  आणि ११ मे या दिवशी मोठ्या संख्येने  नागरिक रस्त्यांवर उतरले. या वेळी झालेल्या निदर्शनांमध्ये भारताचा राष्ट्रध्वजही फडकला. निदर्शने नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षादलांनी बळाचा वापर केला. या वेळी पाकिस्तानी सैन्याने लोकांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.
१. पाकिस्तानने लादलेला कर आणि वाढत्या किमती यांच्या निषेधार्थ पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी ११ मे या दिवशी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना आखली होती; परंतु एक दिवस आधी, अतिरिक्त सैन्य बोलावण्यात आले आणि लोकांना ताब्यात  घेण्यास चालू करण्यात आल्यानंतर जनक्षोभ उसळला.
२. पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरच्या मिरपूर जिल्ह्यात ७० हून अधिक कार्यकर्त्यांना निदर्शने थांबवण्यासाठी वॅारंटविना अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. अटकेच्या दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. यानंतर परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले.
३. पाकिस्तानी सैन्याने लहान मुलानांही सोडले नाही. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये शाळेतील अनेक मुली घायाळ झाल्याचे वृत्त आहे.
४. पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने १० मे या दिवशी संप पुकारला होता. यामध्ये वाहतूकदारांच्या संपाचाही समावेश होता.
५. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने मान्य केले आहे की, तेथे सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे.
६. गेल्या महिन्यातही लोकांनी वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने केली होती. अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तिथे एक किलो पीठ ८०० पाकिस्तानी रुपयांना मिळते.  पूर्वी ते २३० रुपयांना मिळत होते.
सनातन प्रभात १२.५.२४