ब्रिटनमधील बलात्कारी पाकिस्तानी टोळ्या आणि संतप्त ऋषी सुनक

SV    04-Jul-2024
Total Views |
 
     सीरियातील युद्धग्रस्त  असो वा पाकिस्तानातील बेरोजगार असोत, ब्रिटनने सगळ्यांना थारा दिला. पाकिस्तान्यांना राष्ट्रकुल सदस्य म्हणून विशेष जीव लावला. पण आपली विकृत वासना शमविण्यासाठी अनेक पाकिस्तान्यांनी या देशात बलात्कारी टोळ्या बनविल्या. पाच ते दहा पाकिस्तान्यांची गँग तयार करतात. एखादी आठ-दहा, बारा-तेरा वर्षांची ब्रिटीश मुलगी हेरायची, तिचा विश्वास जिंकायचा, तिला ड्रग्ज द्यायचे आणि तिच्यावर बलात्कार करायचा. त्याचे व्हिडीओ बनवायचे आणि बलात्कारांच्या दुष्टचक्रात तिला कायमचे अडकवून टाकायचे.
       या पाकिस्तानी (प्रौढ) मित्रांचे अल्पवयीन ब्रिटीश मुलीवर बलात्कार करण्यात एकमत होण्यामागे कारण काय असेल, तर आपण हे जे काही करतोय, तो गुन्हा नाहीच; उलट हे एक पवित्र पुण्यकर्म आहे, ही यांची सामूहिक भावना आहे !
       अधिकृत आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये पाच हजार अल्पवयीन मूळ ब्रिटीश मुलींवर असे अत्याचार झाले आहेत. एका अन्य अहवालानुसार ही संख्या ५० हजारांवर जाते आहे. अधिकृत प्रकरणांतील ९० टक्के आरोपी पाकिस्तानातील आहेत,  हे विशेष !
      आधीच्या पंतप्रधानांनी  इकडे कानाडोळाच केला   होता. पण ऋषी सुनक पंतप्रधान झाले तेव्हापासून ते या टोळ्यांवर तुटून पडले. त्यांनी स्वतंत्र ग्रुमिंग गँग टास्क फोर्सची स्थापना केली. पालकांमध्ये जागरुकता आणली. पालक आपल्या मुलींच्या मोबाईल फोनवर लक्ष देऊ लागले आणि अनेक पाकिस्तानी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात पकडले जाऊ लागले. नुकताच  एका ग्रुमिंग गँगचा निकाल न्यायालयातही लागला. सगळ्यांना शिक्षा झाली. झाडून सगळे पाकिस्तानी होते. निकाल ताजा असतानाच दोन पाकिस्तानी एका ब्रिटिश अल्पवयीन मुलीला मोबाईल फोनच्या मदतीने जाळ्यात अडकविताना टास्क फोर्सच्या जाळ्यात अडकले, तेही 'रहम करो, रहम करो. ' अशा गयावया करत होते.
.या गुंडांची ओळख पूर्वी आशियाई, अशी सांगण्यात येत असे. ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून सुएला ब्रेव्हरमैन (आता माजी) यांनी पहिल्यांदा, ते मूळ पाकिस्तानी आहेत, हे सुस्पष्ट शब्दांत सांगितले आणि पाकिस्तानचा थयथयाट झाला. एकाचा दोष असेल तर संपूर्ण समुदायाला दोष देणे योग्य नाही, असे उत्तर पाकने दिले. खरे तर इथे कुणी एक पाकिस्तानी नव्हता. सगळेच पाकिस्तानी होते. पण पाकचा तो स्वभावच आहे.
    भारताचे अगदी या उलट आहे. आपण शितावरून भाताची परीक्षा होते, असे मानतो. एकाही भारतीयाबद्दल सुएला असे बोलल्या असत्या तर आपण खजिल झालो असतो. आम्ही माफी मागतो म्हणालो असतो. कठोर शिक्षा द्या म्हणालो असतो. भारत म्हणूनच एक जिता जागता राष्ट्रपुरुष आहे तर पाकिस्तान हा एक धर्मवेड्यांचा बाजार।
पुढारी ५.५.२४