आता व्होट जिहादचे आक्रमण

SV    03-Jul-2024
Total Views |
 
 उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या दरम्यान दोन शब्द नव्याने कानावर आले ते म्हणजे ‘व्होट जिहाद’.  समाजवादी पार्टीच्या प्रचार सभेत मुसलमानांना सांगण्यात आले की, जर आता संघटीत झाला नाहीत तर ‘संघी सरकार’ येणाऱ्या पिढीला नष्ट करून टाकेल. त्यामुळे व्होट जिहादची वेळ आलेली आहे. सलमान खुर्शीद यांच्यासमोर                     त्यांच्या भाचीने सांगितले की,  जे मुसलमान बीजेपीने त्यांच्या सभेला जातात, बीजेपीला समर्थन देतात, त्यांना वाळीत टाकले पाहिजे, त्यांचे हुक्कापाणी बंद केले पाहिजे. आजपर्यंत आपण 'लव जिहाद' हा शब्द अनेक वेळा ऐकला असेल पण या निवडणुकीत 'व्होट जिहाद' या शब्दाने नव्याने एंट्री घेतली आहे. ही एंट्री करणारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची भाची आहे. मारिया आलम खान हे तिचे नाव, ती समाजवादी पार्टीची नेता आहे. ही मारिया आलम खान फरुकाबादच्या कायमगंजमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलत होती. फरुकाबाद येथून सलमान खुर्शीद दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची आघाडी झाल्यामुळे ती जागा समाजवादी पार्टीकडे गेली. तेथून समाजवादी पार्टीचे उमेदवार नवल किशोर शाक्य हे ती जागा लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मारिया खान तेथे आली होती कारण त्या भागात मुसलमान मतदारांची संख्या अधिक आहे.  मारिया खान सुरुवातीला बीजेपी उमेदवार मुकेश राजपूत यांच्या प्रचारासाठी गेलेल्यांना मुसलमानांना समाजाची गद्दारी करणारे असे म्हणाल्या आणि त्यांचे हुक्कापाणी बंद करण्यास सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की, मुसलमान समाजावर ज्या प्रकारे हल्ले होत आहेत ते थांबवायचे असतील तर मुसलमान समाजाने एकजूट होऊन बीजेपी विरुद्ध मतदान केले पाहिजे.  सीएए- एनआरसीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, जर होणारे अत्याचार रोखायचे असतील तर व्होट जिहाद करावा लागेल. होणाऱ्या या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्होट जिहाद हाच एकमेव मार्ग आहे.
 मारिया यांच्या भाषेत सांगायचे तर, त्या म्हणाल्या की, “सद्यस्थितीचा विचार करता, आज या कुर्बानीची गरज आहे. आम्ही अशा ठिकाणी पोहचलो आहोत जेथे एकटे जिंकूही शकत नाही आणि हारूही शकत नाही. जर आताही आम्ही एक झालो नाही तर लक्षात ठेवा आम्हाला नामशेष करण्याचे संघी सरकारचे प्रयत्न यशस्वी झाल्याशिवाय रहाणार नाहीत. त्यांच्या योजना सफल झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आपली बुद्धी शाबूत ठेवून, फारसे भावनिक न होता, शांतपणे, एकत्रित येऊन मतदानाचा जिहाद करा. आम्ही फक्त मतदानाचा जिहाद करूनच संघीय सरकारला  पळवून लावू शकतो. मला हे ऐकल्यावर लाज वाटली की, काही मुसलमानांनी मुकेश राजपूत यांच्याबरोबर मिटींग केली. मला वाटते की, समाजाने त्या लोकांचे हुक्कापाणी बंद केले पाहिजे. इतके स्वार्थी बनू नका ज्यामुळे आपल्या मुलांची आयुष्याचा खेळखंडोबा होईल. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. आज अनेक जण सीएए- एनआरसीमुळे तुरुंगात बंद आहेत. एक समाधानाची बाब म्हणजे या सर्वांची केस सलमान खुर्शीदसाहेब फी न घेता लढत आहेत. आम्ही लढत आहोत, तुमच्यासाठी संघर्ष करीत आहोत. पण तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिला नाहीत तर आम्ही एकटे काय करणार ? कारण आमची ताकद तुम्ही आहात. आता काही होणार नाही असे म्हणत हताशपणे बसून राहिलात तर ते चालणार नाही. आम्ही शंभर वेळा लढू , शंभर वेळा हरू पण तरीही पुन्हा उठून उभे राहू. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रचार सभेत ऐकायला येते की, संविधान धोक्यात आहे. लोकशाही संकटात आहे. मी म्हणते की, मानवताच धोक्यात आहे, माणुसकीवरच हल्ला झालेला आहे. त्यामुळे भरपूर विचार करून मतदान करा. कुणाच्या बोलण्याला किंवा आग्रहाला बळी पडू नका.”   मारिया खान व सलमान खुर्शीद हे धर्माच्या नावाखाली मत  मागून आचारसंहितेचा भंग करीत आहेत म्हणून फरूकाबाद पोलिसांनी त्यांच्यावर खटला भरला आहे. अखिलेश यादव आणि राहुल गांधी या जोडीला असे वाटते की, उत्तर प्रदेशात मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान केले तर बीजेपीला टक्कर देणे  सहज शक्य होईल. पण मुसलमान मतदार काय विचार करतात. कोणाला मत देतात हे जाणण्यासाठी कोण्या तज्ञाची गरज नाही. पूर्वी मतदार डोळे मिटून सायकलचे बटन दाबत होता पण आता परिस्थिती बदलली आहे. आता दोन वेळचे रेशन मिळते आहे, न्याय व्यवस्था उत्तम झाली आहे, पोलीस उगाच त्रास देत नाहीत, गुंड लुटालूट करीत नाहीत, घरे बनत आहेत,  रस्ते बनत आहेत, सुख समाधानाचे जीवन जगत आहेत. त्यामुळे मुसलमान विचार करू लागले आहेत की, परिस्थिती  बदलते आहे तर आपणही बदलले पाहिजे. मुसलमान नेत्यांना भीती वाटत आहे की, मुसलमानांची मते फुटतात की काय ? म्हणूनच ते 'जिहाद' या चलनी नाण्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुसलमानांना भीती दाखवण्यात येत आहे की, बीजेपी परत निवडून आली  तर आपले अस्तित्वच संपून जाईल. इकडे असे दिसते की, बीजेपी मुसलमान मतांवर अवलंबून नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्पष्टपणे सांगायला मागेपुढे पहात           नाहीत की,  बंगालमध्ये ममता सरकार बांगलादेशींना बेकायदेशीरपणे वसवून हिंदुंच्या  राज्यात हिंदुंनाच अल्पसंख्यक करण्याचा प्रयत्न करीत आहे.
  रजत शर्मा ब्लॉग                                                                     
 इंडिया टीव्ही २.५.२०२४