वासुकी जातीच्या सापाचे जीवाश्म आढळले !

SV    08-Jun-2024
Total Views |
 
सुमारे ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी वास्तव्य करणाऱ्या वासुकी इंडिकस नावाच्या सापाच्या एका प्राचीन प्रजातीचे जीवाश्म  गुजरातमध्ये सापडले आहेत. सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, संशोधकांनी गुजरातमधील कच्छमधील पाणधराव लिग्नाइट खाणीतून सापडलेल्या नवीन नमुन्याचे वर्णन केले आहे, जे मध्ययुगीन काळातील आहे. या प्रजातीला वासुकी इंडिकस असे नाव देण्यात आले आहे. वासुकी हे नाव भगवान शंकराच्या गळ्याभोवती गुंडाळलेल्या नागावरून पडले आहे. इंडिकस या शब्दाचा अर्थ भारत असा होतो. शास्त्रज्ञांनी या नावावरून दाखवून दिले आहे की हा साप फक्त भारतातच आढळत होता आणि तो भगवान शिवाच्या नागराजासारखा शक्तिशाली आणि प्रचंड होता.
संशोधकांनी २७ प्रकारच्या संरक्षित कशेरुक जातींचे वर्णन केले आहे. (कशेरूक-शरीरात मेरुदंड असलेली प्रजाती) कशेरुकाची लांबी ३७.५ ते ६२.७ मिमी आणि रुंदी ६२.४ ते १११.४ मिमी आणि शरीर दंडगोलाकार असते. आयआयटी रुरकी येथील संशोधकांचा असा दावा आहे की आता नामशेष झालेला हा साप जगातील सर्वात लांब सापांपैकी एक असावा. आजचे ६ मीटर (२० फूट) ॲनाकोंडा आणि अजगर याच्या तुलनेत काहीच नव्हते. संशोधकांचा अंदाज आहे की वासुकी इंडिकसची लांबी १०.९ ते १५.२ मीटर दरम्यान असावी.

अमर उजाला २१.४.२४