शिखांच्या शस्त्रावर भगवान विष्णूंचा मंत्र

SV    06-Jun-2024
Total Views |
 
 खलिस्तानी अनेकदा हिंदू आणि शीखांमध्ये फूट पाडण्यात गुंतलेले असतात. ते शीख धर्माला सनातनचा  भाग मानत नाहीत ते स्वतःला हिंदुविरोधी म्हणवतात व तसा प्रचार करतात.
शीख इतिहास तज्ञ पुनीत साहनी यांनी सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की हे शीखांच्या खालसा सैन्याचे शस्त्र आहे, ज्याला चक्कर म्हणतात. हे सुमारे २०० वर्षे जुने आहे. तसेच, त्यावर सोन्यामध्ये एक मंत्र कोरलेला आहे, जो गुरू अर्जुन देव यांनी रचला होता. याला 'रक्षा मंत्र' म्हणतात, म्हणजेच त्यात रक्षणासाठी प्रार्थना केली आहे. या मंत्रामध्ये भगवान विष्णूची प्रार्थना करण्यात आली आहे.  हा  मंत्र सहसंस्कृती भाषेत लिहिलेला आहे, जे संस्कृतचे एक रूप आहे. गुरू नानक देवजींनी त्याचा वापर सुरू केला.
पुनीत साहनी यांनी सांगितले की, खलिस्तानी अनेकदा हिंदू आणि शीखांमध्ये फूट पाडण्यात गुंतलेले असतात. ते शीख धर्माला सनातनचा भाग मानत नाहीत आणि स्वतःला हिंदुविरोधी म्हणत त्याचा प्रचार करत आहेत. तर सत्य हे आहे की सर्व शीख गुरू, हिंदू देवी-देवतांची पूजा करत असत. गुरू गोविंद सिंग हे दुर्गा मातेची पूजा करायचे, त्यांनी रामकथाही लिहिली. या वर्तुळावर कोरलेला मंत्र  असा आहे:
सिर मस्तक रख्या पारब्रहमं हस्त काया रख्या परमेस्वरह॥
आतम रख्या गोपाल सुआमी धन चरण रख्या जगदीस्वरह॥
सरब रख्या गुर दयालह भै दूख बिनासनह॥
भगति वछल अनाथ नाथे सरणि नानक पुरख अचुतह ॥५२॥
हा मंत्र शिखांच्या सर्वात पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबमध्ये लिहिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे - मस्तक, कपाळ, हात, पाय, शरीर, आत्मा, संपत्ती-सर्व प्रकारे प्राणीमात्रांचे रक्षण करणारा परमात्मा म्हणजे गोपाळ, स्वामी, जगदीश्वर, भगवंत-हा परमदयेचे निवासस्थान आहे. तोच सर्व दुःखांचा नाश करणारा आहे. हे नानक!  तो देवाच्या सेवकांचा आश्रय आहे आणि त्याला भक्ती आवडते. त्या अविनाशी सर्वव्यापी परमेश्वराचा आश्रय घ्या.” गोपाल आणि जगदीश्वर ही भगवान विष्णूंची नावे आहेत.
‘विष्णु सहस्रनामात' या नावांचा उल्लेख आहे.  हा इतिहास समजल्यानंतर लोक म्हणतील की, खलिस्तानी आपली मुळे नाकारू शकतात पण पुसून टाकू शकत नाहीत.
ऑप इंडिया २०.४.२४