सुधा वाणी सुधी वाणी

SV    26-Jun-2024
Total Views |
 

सुधा वाणी सुधी वाणी हे पुस्तक श्री. रंगा हरिजी यांनी लिहिले आहे.  ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ  प्रचारक आणि विचारवंत होते. कोरोना काळात लॉकडाऊन असताना मनाला शांतता लाभावी म्हणून त्यांनी लहानपणी शिकलेल्या सुभाषितांचे संकलन केले. ती स्वत: लिहून काढली. स्वानंद आणि मन:शांती मिळवण्याच्या प्रयत्नातून या छान पुस्तकाची निर्मिती झाली.
समाजात उच्च संस्कार, नैतिकता आणि उच्च जीवनमूल्यांची स्थापना होण्यासाठी सुभाषित हे एक प्रभावी माध्यम आहे. सुभाषितामध्ये एखादी  गोष्ट /विचार  गद्य किंवा पद्यात सांगितला जातो. त्यातून बोध घेता येतो.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर स्वयंसेवकांवर संस्कार होण्यासाठी सुभाषिते सांगितली जातात. देशभक्ती, समाजहित, धर्म, कर्तव्यनिष्ठा आणि देशासाठी समर्पण विषयक   भावना व्यक्त करणारी  सुभाषिते, महापुरुषांची अमृतवचने आणि प्रेरणागीते संघाच्या नित्य कार्यक्रमाचा  जणू प्राण आहेत.
आर्य चाणक्य यांच्या मते जीवनात अन्न-पाण्याइतके सुभाषित महत्वाचे आहे. या संकलनात रंगा हरिजी यांनी प्रत्येक सुभाषित कथेच्या आधारे  समजावून दिले आहे. बालमनावर संस्कार करण्यासाठी सुभाषितांचा योग्य प्रचार कुटुंबातून सुरुवातीला व्हायला हवा. यादृष्टीने हे पुस्तक संग्रहणीय आहे.
१६० पानांच्या या पुस्तकाचे मूल्य १५०/- रुपये आहे.

पुस्तक मिळण्याचे ठिकाण
प्रभात पेपरबॅक्स
४/१९ असफअली रोड,
नवी दिल्ली ११०००२.
फोन - २३२८९७७७