क्रांती

SV    31-May-2024
Total Views |
 
 अर्जविनंत्यांनी इंग्रज केव्हाही हिंदुस्थान सोडून जाणार नाहीत व सनदशीर राजकारण करण्यास सनदच नाही. म्हणून हिंदुस्थानचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यास, इंग्रजी राज्याच्या  मुळावर घाव घालणे, - सशस्त्र क्रांती-हाच मार्ग ! ह्या विचारातून सावरकरांनी सन १९०० मध्ये ‘मित्रमेळा' ह्या क्रांतिकारक संस्थेची स्थापना केली. सन १९०४ मध्ये मित्रमेळ्याचे 'अभिनव भारत' ह्या संस्थेत रुपांतर झाले. 'फ्री इंडिया सोसायटी' ही संस्थाही सावरकरांनी काढली होती. ह्या संस्थांच्या द्वारे सावरकरांनी हिंदुस्थानातून उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला येणाऱ्या अनेक बुद्धिमान तरुणांची मने क्रांतिप्रवण केली. त्यांच्याच  क्रांतिकारक संस्थेतील सेनापती बापट व हेमचंद्र दास ह्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून बाँब करण्याची विद्या मिळवून ती हिंदुस्थानात आणली.
सावरकर विचारदर्शन
 – डॉ. अरविंद गोडबोले