स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

SV    23-Apr-2024
Total Views |
 

सावरकरांचे असीम देशप्रेम, त्यांचे साहस, निर्भीडपणा, विद्वत्ता, काळ्या पाण्यासारख्या भीषण कारावासात आपले मानसिक आणि शारीरिक संतुलन ढळू
न देता तग धरून राहणे आणि 'कमला' सारख्या सर्वांगसुंदर काव्याची निर्मिती तिथेच राहून करणे ह्या सगळ्याच गोष्टी त्यांचे प्रचंड मनोबल दाखवणाऱ्या आहेत. त्यांचे साहित्य वाचून मनाला नवीन उभारी मिळते. आपल्या उदात्त ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर आपल्याला
अडवू शकेल असे काहीच नाही ह्याची प्रचिती सावरकर वाचताना आणि समजून घेताना येत राहते.
सावकरांचे हिंदुत्वया विषयावर सामान्य वाचकाला कळेल अशा सोप्या भाषेत पुस्तक लिहिण्याचे लेखक अक्षय जोग यांनी ठरविले.
स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र आणि त्यांच्या विचारांचा गेली चौदा वर्षे अभ्यास करत असताना सावरकरांच्या हिंदुत्वावर स्वतंत्र पुस्तक लिहावे असे लेखकास वाटत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्व पुस्तकासह डॉ. अरविंद गोडबोले, डॉ. श्रीरंग गोडबोले, शेषराव मोरे आणि स.ह, देशपांडे यांच्या पुस्तक आणि लेखाच्या माध्यमातून लेखकास 'सावरकरांचे हिंदुत्व' समजत गेले. लेखकाचे सावरकरांच्या हिंदुत्वाविषयीचे आकलन विस्तारत गेले. हिंदुत्व हा शब्द जरी सावरकरांशी जोडला गेलेला असला तरी विविध व्यक्ती /संघटना/संस्थांनी हिंदुत्वावर आपला विमर्श मांडला आहे. उदा. स्वामी विवेकानंद योगी अरविंद, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद इ. पण या सर्वांच्या हिदुत्वात आणि सावरकरांच्या हिंदुंत्वात लेखकास मुलभूत फरक दिसून आला.
तसेच सावरकरांचे हिंदुत्व याविषयी सावरकर विरोधकांमध्ये जितके गैरसमज आहेत, त्याहून जास्त गैरसमज सावरकर प्रेमी, अभ्यासक भक्त यांच्यामध्ये असल्याचे दिसून आले. म्हणजे या विषयीच्या पुस्तकाची आवश्यकता होतीच म्हणून याविषयी स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचे लेखकाने निश्चित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गेली, अनेक वर्षे अभ्यास करणारे लेखक श्री. अक्षय जोग ह्यांना भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने (ICHR) लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीमध्ये संशोधकासाठी प्रवासाकरिता अर्थसहाय्य केले होते. स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या 'हिंदुत्व' ह्या ग्रंथाची चांगली उकल ह्या पुस्तक वाचनाने होईल. हिंदुंचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि स्थान ह्यावरील विश्लेषण वाचकांचे आकलन अधिक स्पष्ट करू शकेल. 'तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू' ह्या स्वा. सावरकरांच्या कवितेच्या व्यापक अर्थ वाचकांना ह्या पुस्तकातून समजायला सहाय्य होईल. १०० पानांच्या या पुस्तकाचे मूल्य रु. २००/- आहे.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण - १. भारतीय विचार साधना, पुणे १. भाविसा भवन, १२१४/१५
पेरूगेट भावे हायस्कूल जवळ पुणे ३० मो. ९३५९५२७२४५   २. 'मोतीबाग' ३०९ शनिवार पेठ, पुणे ३०