मुसलमानांनी ऐतिहासिक चुका मान्य केल्या पाहिजेत – योगी आदित्यनाथ

SV    05-Sep-2023
Total Views |
 
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुलाखतीतील काही मुद्दे येथे एकत्रित देत आहोत.
मुसलमान समाजाला मी अपील करू इच्छितो की, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानची दुर्दशा आपण पहात आहोत. दुसर्‍यांसाठी जे काटे पेरतात त्यांच्यावर पुष्पवर्षाव कधी होत नाही. ते काटेच त्यांच्या शरीराला घायाळ करतात.
ज्ञानवापी मशिदी बाबत बोलताना ते म्हणाले की, परमेश्वराने जी दृष्टी दिली आहे त्याने नीट पहा. त्रिशूळ मशिदीत काय करीत आहे ? एक तो असतो जो जन्मानेच अंध असतो; पण जाणूनबुजून एखादा दिसत नसल्यासारखे करीत असेल त्या ढोंगी माणसाला कोणीच काहीच दाखवू शकत नाही. तुम्ही इतिहासाची मोडतोड करू शकता पण ऐतिहासिक पुराव्यांची नाही. त्या भिंती ओरडून सांगत आहेत, खरे काय आहे ते. खरे म्हणजे मुसलमान समाजाकडून प्रस्ताव आला पाहिजे की, आमची ऐतिहासिक चूक झाली आहे आणि आम्ही चुकीचे निराकरण करू इच्छितो आहोत.
देश हा संविधानावर चालतो, एखाद्या विचारावर किंवा धर्मावर नाही. आपला धर्म घरात, मशिदीत, इदगाह पर्यंत असेल. तो रस्त्यावर चालणार नाही. नेशन फस्ट ! या देशात ज्याला रहायचे असेल तर त्याने राष्ट्र हे सर्वोपरी मानले पाहिजे, आपल्या धर्माला नव्हे. जगात अल्पसंख्यक समाज बहुसंख्यक समाजाबरोबर मिळून मिसळून रहाण्याची गोष्ट करतात. दुर्भाग्याची बाब आहे  की, भारतात अल्पसंख्यक विशेष अधिकारांची मागणी करतात. एक देश- एक कायदा असला पाहिजे.
विरोधी पक्ष जे एकत्र झाले आहेत आय.एन.डी.आय.ए. गठबंधन आहे त्याला इंडिया म्हणणे चुकीचे आहे, तो तर डॉट कॉम ग्रुप आहे. कपडे बदलले म्हणून कर्मापासून मुक्ति मिळत नाही.
 पांचजन्य  १३.८.२३