महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर

21 Sep 2023 11:06:26
 
sansad bhawan
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांमधील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित विधेयकाला सोमवारी (१८ सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदारांनी नव्या संसदेत प्रवेश केला. नव्या संसदेतील पहिल्याच भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवलं. यावर दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी चर्चा केली. कोणत्याही प्रमुख पक्षाने या विधेयकाला विरोध केला नाही. परंतु विरोधी पक्षांनी याची अंमलबजावणी लवकर व्हावी, तसेच यात ओबीसींचा समावेश व्हावा अशा मागण्या केल्या.
लोकसत्ता २१/९/२३
Powered By Sangraha 9.0