होयसळ मंदिरे, जागतिक वारसा

SV    20-Sep-2023
Total Views |
 
रियाध : कर्नाटकातील बेलूर, हळेबीड आणि सोमनाथपुरा येथील प्रसिध्द होयसळकालीन मंदिरे आणि कोलकत्त्यातील शांतिनिकेतनाची इमारत यांना 'युनेस्को' ने वारसास्थळे म्हणून घोषित केले आहे.होयसळकालीन मंदिरांना जागतिक वारसा स्थळ घोषित केल्याची घोषणा करण्यात आली. होयसळकालीन मंदिरे १५ एप्रिल २०१४ पासून 'युनेस्को' च्या हंगामी यादीमध्ये समाविष्ट आहेत. आता त्यांना कायमस्वरूपी हा दर्जा देण्यात आला. हे भारतातील ४२ वे वारसा स्थळ आहे. नोबेल विजेते साहित्यिक, विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनाला सौदी अरेबियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला.
 म.टा. १९.९.२३