तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

SV    18-Sep-2023
Total Views |
 
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेवरून घूसखोरीचा प्रयत्न उधळवून लावत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. उरी प्रांतात नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. यामध्ये घूसखोरीचा प्रयत्न उधळवून लावण्यात आला. असे सैन्याच्या चिनार कोअरकडून 'एक्स' द्वारे सांगण्यात आले.
म.टा.१७.९.२३