पाकव्याप्त काश्मीर भारताचेच - युएईने पाकिस्तानला खडसावले

SV    16-Sep-2023
Total Views |
 
पाकव्याप्त काश्मीरबाबत ( पीओके )  पाकिस्तानने केलेला अपप्रचार फोल ठरला आहे. एकेकाळी पाकिस्तानच्या प्रत्येक प्रपोगंडास पाठिंबा देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीनेही (युएई) आता पीओके हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे.
युएईचे पंतप्रधान सैफ बिन झाएद अल नाहयान यांनी भारत-पश्चिम आशिया- युरोप आर्थिक कॉरिडॉरवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात जम्मू-काश्मीरचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचा भाग म्हणून दाखवला आहे. त्यात पीओके आणि अक्साई चीनचा भागदेखील समाविष्ट आहे. त्यामुळे आता प्रमुख इस्लामिक देशही  काश्मीर प्रश्नावर पूर्णपणे भारताबरोबर उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई तरुण भारत १६-९-२३