अनेक हिंदूंना आपल्या मूळ धर्मात आणणारे अखिल भारतीय घरवापसी प्रमुख प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी आणखी २५० धर्मांतरित हिंदूंची घरवापसी केली. ख्रिश्चन झालेले हे सर्व जण वेगवेगळ्या ३६ परिवारातील आहेत. हा घरवापसीचा कार्यक्रम बुढीमाई धाम, चिकणीपाली येथील इमलीपारा (छत्तीसगढ) येथे झाला. यावेळी वैदिक मंत्रोच्चारात होणारा यज्ञही आयोजित केला होता.
या कार्यक्रमात घरवापसी करणाऱ्या सर्व लोकांचे पाय प्रबल प्रताप सिंह यांनी गंगाजलाने धुतले. त्यावेळी धर्म जागरण समन्वय विभाग व आर्य समाजाशी संबंधित कार्यकर्ते उपस्थित होते. वैदिक मंत्रोच्चारात झालेल्या हवनात घरवापसी करणाऱ्या सर्व सदस्यांनी भाग घेतला. नंतर सगळ्यांनी एकस्वरात हिंदू देवतांचा जयघोष करीत भविष्यात हिंदू धर्मातच राहण्याचा संकल्प सोडला.
यावेळी बोलताना प्रबल प्रताप सिंह म्हणाले की, ''धर्मांतराचे षड्यंत्र हे राष्ट्रीय एकतेसाठी आणि अखंडतेसाठी फार मोठा धोका आहे. हे मिशनरी आमच्या सनातन संस्कृतीला नष्ट करू पाहत आहेत. येथील सतेवर असलेले कॉंग्रेस सरकार आणि प्रशासन हे देखील मिशनऱ्यांच्या कारस्थानाकडे दुर्लक्ष करीत आहे.'' उपस्थित असलेल्या अन्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू समाजाचे ऐक्य टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे यावर जोर दिला व सर्वांनी बंधुभावाने रहाण्याचे आवाहन केले.
बस्तर क्षेत्रातून जाणाऱ्या संतांच्या पदयात्रेच्या दरम्यान हा घरवापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ही यात्रा जशपुरहून रायपूरला निघाली होती. यात्रेत मिशनऱ्यांच्या प्रभाव असलेल्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला जात होता.
यापूर्वीही प्रबल प्रताप सिंह यांनी घरवापसीचे कार्यक्रम आयोजित केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी २०२३ मध्ये प्रबल प्रताप सिंह यांनी छत्तीसगढच्या महासमुंद जिल्ह्यातील बनसा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात ११०० ख्रिश्चन झालेल्या हिंदूंची घरवापसी केली. २०२२ मध्ये प्रबल प्रताप सिंह जूदेवांच्याच उपस्थितीत उडीसामधील सुंदरगढ जिल्ह्यातील ख्रिश्चन झालेल्या १७३ परिवारातील साधारण ५०० लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली. त्यांनीच मार्च २०२२ मध्ये छत्तीसगढ येथील महासमुंद जिल्ह्यात आणखी एके ठिकाणी घरवापसीचा कार्यक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी ख्रिश्चन झालेल्या १२५० लोकांची घरवापसी केली होती.
ऑप इंडिया २२.२.२३
Regards-:
Sanskrutik Vartapatra
C-1, Shalini Residency,
ICICI Bank Building, Gate-2
Hingane Budruk, Karvenagar,
Pune 411052
Maharashtra
Ph-:020-29952037
Mob-:9604993715