राजकीय पक्ष म्हणून अन्य एखाद्या राजकीय पक्ष, युती अथवा विचारधारेचा विरोध अगदी स्वाभाविक आहे. पण तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पुत्र द्रमुक नेते उदयनिधी यांनी सनातन धर्माच्या थेट उच्चाटनाबद्दल वल्गना करणे- एखाद्या धर्माला संपवण्याची भाषा करणे हा पहिलाच प्रकार आहे. आजवर काँग्रेस आणि तत्सम विचारसरणीच्या पक्षांकडून सेक्युलॅरिझमच्या नावाखाली अल्पसंख्यकांचे लांगूलचालन उघड उघड घडत होते. काँग्रेसचा हिंदू द्वेषही रामजन्मभूमी, रामसेतू अशा कित्येक प्रसंगातून लपून राहिलेला नाही. पण यंदा आपण एकटे नाही झुंडीत आहोत म्हटल्यावर या चलाख कोल्ह्यांनी गळे काढायला सुरुवात केली. या विधानांचा इंडिया आघाडीतील ३-४ पक्षांनी केलेला तोंडदेखला विरोध वगळता कोणीही त्याविरोधी मतप्रदर्शन केले नाही. आगामी निवडणुकीत अशा निधर्मी टोळीला मतदार त्यांची जागा दाखवून देतील हे नक्की. मु.त.भा.१४.९.२३