'दगडूशेठ' समोर ३६ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

SV    08-Nov-2023
Total Views |
 
 ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले होते. ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमी निमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. रशिया व थायलंड येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष होते.
महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. मोबाईलचा टॉर्च उंचावून देखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला. पहिले २० महिलांचे  पथक  पहाटे २ वाजता उपस्थित झाले. तेव्हापासूनच महाराष्ट्रभरातून उपक्रमास आलेल्या महिलांची येथे  येण्यास सुरुवात झाली.                  
     न्यूज १८ मराठी २०.९.२०२३