३६० अंशात फिरणारे शिवलिंग

04 Nov 2023 10:36:27
 
 छत्तीसगढच्या बारसूर मद्ये एक अद्भूत शिवमंदिर आहे. ऐतिहास नगरी बारसूर येथे असलेले हे मंदिर बत्तीस मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर आपल्या ३२ खांबांमुळे जसे प्रसिध्द आहे तसे ते दोन गर्भगृह असलेले एकमेव मंदिर म्हणूनही प्रसिध्द आहे. यातील महादेवाचाही सोमेश्वर महादेव व गंगाधरेश्वर महादेव म्हणून शिलालेखात उल्लेख आहे. १२०८ मध्ये नाग शासन काळात राजमहर्षी गंगमहादेवी हिने हे मंदिर बनवले होते. या मंदिरातील शिवलिंग स्वतःभोवती ३६० अंशात फिरते. सर्वसाधारणपणे शिवलिंगाच्या जलतरीचे तोंड उत्तर दिशेला असते. पण या मंदिरात शिवलिंगाला फिरवून त्याचे तोंड भक्त कोणत्याही दिशेला करू शकतात.
स्वदेश २१.८.२३
Powered By Sangraha 9.0