४३ वर्षांपूर्वी १९८० साली उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे ईदच्या दिवशी दंगल उसळली होती ज्यात ८३ लोक मारले गेले आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले. या दंगलीनंतर सक्सेना आयोग तयार करण्यात आला. विस्तृत चौकशीनंतर या आयोगाने ८३ साली आपला अहवाल सादर केला. तो विधानसभेत जाहीर होणे ही पुढची पायरी. मात्र तब्बल ४३ वर्षे तिथल्या विविध सरकारांनी हा अहवाल दडपून ठेवला. मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी १४ वेळा पटलावर ठेवण्यात आला मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही.
या अहवालात, डॉ. शमीम अहमद यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग आणि डॉ. हमीद हुसेन यांच्या नेतृत्वाखालील खाकसार, समर्थक आणि भाडोत्री गुंडांनी ही दंगल घडवली; ही दंगल योजनापूर्वक घडवून आणली असा निष्कर्ष काढला आहे.
तब्बल ४३ वर्षे हा अहवाल दडपून ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले, “हा अहवाल जनतेसमोर आलाच पाहिजे. दंगे कोण घडवतात, त्याचे समर्थन कोण करतात आणि दंगे होऊ नयेत यासाठी कोण प्रयत्न करतात हे यामुळे लोकांच्या लक्षात येईल.”
राष्ट्रदेव, २३ सप्टेंबर