‘रझाकार’ चित्रपटात दिसणार आजवरचा अज्ञात इतिहास, हजारो हिंदू मुलींवर झाला बलात्कार आणि लाखो जणांचे झाले शिरकाण - तत्कालीन हैदराबाद प्रांतातील असफजाही वंशाच्या निजामशाहीत रझाकारांनी हिंदुंवर केलेल्या अत्याचारांवर आधारित ‘रझाकार’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. त्यातील दृश्ये भयानक आहेत. एका दृश्यात रायफलच्या दस्त्याच्या पुढे असलेल्या टोकावर एका मारलेल्या हिंदूला लटकावले आहे; आसपास इतर रझाकार घोड्यांवर बसलेले आहेत. ही एक झलक. या पोस्टर प्रकाशनाच्या वेळी चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन यता सत्यनारायण यांचे आहे. अभिनेत्री वेदिका हिची विशेष भूमिका आहे. तेलगु खेरीज तमिळ, कन्नड आणि मल्याळी भाषेतूनही हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. अखंड भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना हैदराबाद संस्थानात नवाब बहादूर यार जंग याने मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन नावाचे एक दल तयार केले. त्याने रझाकारांची स्वतंत्र फौज तयार केली, त्यात सामान्य मुस्लिम जनताही सामील होती. नवाबाची फौज आणि रझाकार अशा दुहेरी दहशतीला तेथील हिंदू तोंड देत होते. ह्या फौजेचे नेतृत्व निजामाकडे नसून नवाबाकडे होते रझाकारांनी हजारो हिंदू मुलींवर बलात्कार केले आणि लाखो हिंदुंची नृशंस हत्या केली. नवाबानंतर रझाकारी फौजेचे नेतृत्व दुसरा क्रूर आक्रमक कासीम रिझवीकडे आले. भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र फाळणी होऊन पाकिस्तान नावाचे शत्रूराष्ट्र जन्माला आले. या उरलेल्या भारतालाही इस्लामी राष्ट्र बनवण्याचे कासीम रिझवीचे स्वप्न होते. के. एम. मुन्शी यांनी आपल्या ‘द एंड ऑफ अॅन इरा’ या पुस्तकात लिहिले आहे की कासीम रिझवी उद्दामपणे म्हणत असे, ‘आम्ही गझनीच्या महमूदाचे वंशज आहोत. आम्ही जर ठरवलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरसुध्दा असफजाही राजवटीचा झेंडा फडकवू शकतो !’ सूर्या न्यूज स्टाफ १६.७.२३