'टाइम्स ऑफ इंडिया'त अंबिका सोनी यांचा लेख आला आहे. त्यात त्या लिहितात की, 'जमायत उल्मा ए हिंद' चे दोन गट एक झाले पाहिजेत. त्याचे कारण स्पष्ट करताना त्या लिहितात, मुस्लिम द्वेष देशात निरनिराळ्या मार्गाने पसरवला जात आहे. त्यामुळे देशाचे वातावरण चिंताजनक बनत आहे. यामुळे मुस्लिम समाज त्रस्त आहे. बाबरी मशिद ते ज्ञानव्यापी मशिदीपर्यंतच्या घटनामुळे मुस्लिम समाज भांबावून गेला आहे. आता तर महमद पैगंबराचा अपमान करणाऱ्या वक्तव्याने कळस गाठला आहे. त्यामुळे मुस्लिम द्वेष टोकाला पोचला आहे. त्यांचे प्रगतीचे रस्ते बंद झाले आहेत. आज राजकारणापासून समाजाकारणापर्यंत मुस्लिम द्वेष पराकोटीला पोचला आहे. यामुळे मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना 'जमायत उल्मा ए हिंद' काळजीत पडली आहे. अंबिका सोनींना असे वाटते की, अशा भयानक स्थितीला तोंड देण्यासाठी जमायतच्या दोन गटांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. यानंतर आपण सोशल मिडियावर जमायतचे दोन नेते अरशद मदनी आणि महमद मदनी एका सोफ्यावर बसलेले आहेत असा फोटो पाहून खुश झालो.
आश्चर्याची बाब आहे की जेव्हा मुस्लिमांना सर्व (हिंदू) तुच्छ समजतात तेव्हा मुस्लिम समाज संघटित होण्याचा विचार करू लागतो आणि हिंदू समाजातील अनेक जाती-पाती (ब्राह्मण, क्षत्रिय,दलित, वैश्य, आदिवासी) ताकदीने संघटित होतात तेव्हा एकमताने वाटचाल करण्याचा विचार करून मार्गस्थ होतात. हा फरक आपल्या कधी लक्षात येणार?
विचार करा, जमायतचे दोन गट एकत्र येऊन काय होणार? हे गट आज स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाचे कोणते नुकसान झाले आहे? कोणते काम अडले आहे? दोन गटात वैर नाही. एक बाब मी स्पष्ट करतो की, मी दोन गट एकत्र व्हावेत या विरुध्द नाही पण एकत्र येऊन काय फायदा होणार हे मला समजत नाही.
मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाखाली हिंदूंना संघटीत होण्याची हाक दिली जात आहे. देशातील हिंदूंना एक करण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू आहेत. हिंदूंच्या भल्याची अनेक सेवाकार्ये सुरू आहेत. ही सर्व कामे हिंदूंच्या अनेक संघटना (जाती पातींच्या संघटना) स्वतंत्रपणे करत आहेत. या सर्व स्वतंत्र संघटनांची, एक संघटना करण्याचा प्रयत्न हिंदू कधीही करत नाहीत. या संघटना एक दुसऱ्याच्या विरोधात नाहीत. या संघटनांना फक्त 'हिंदुत्वाचे भान कधीही सोडू नका', एवढेच नाहीत. या संघटना एक दुसऱ्याच्या विरोधात नाहीत. या संघटनांना फक्त 'हिंदुत्वाचे भान कधीही सोडू नका', एवढेच आवाहन केले जाते.
या उलट आमच्या मुस्लिमांच्या संघटना 'आपण प्रथम मुस्लिम आहोत', हा विचार न करता (मस्लक) शिया, सुनी, देवबंदी, बरेलवी इ. जाती, पंथांचा विचार करूनच काम करत असतात. मुस्लिमांवर जेव्हा असे संकट येते (बाबरी मशिद, ज्ञानव्यापी प्रकरण) तेव्हा त्यांना मुस्लिम म्हणून एका फ्लॅटफार्मवर येण्याचे आवाहन केले जाते. पण आजपर्यंत याला काहीही यश आले नाही.
या उलट हिंदू समाजात जातीभेद एवढे तीव्र असून सुध्दा बाबरी मशीद, ज्ञानव्यापी संघर्षात दलित हिंदूसुध्दा ब्राह्मणांएवढ्याच त्वेषाने आंदोलनात एक विचाराने उतरतात. अशावेळी हिंदू, जातीभेद दूर ठेवून 'हिंदू आहोत' या एकाच विचाराने काम करतात. याउलट आम्ही मस्लक दूर ठेऊन संघटित होण्याचे आवाहन करतो पण आम्ही प्रथम मुसलमान होत हेच विसरलेलो असतो. त्यामुळे आंदोलन संपले की आम्ही परत शिया, सुन्नी, देवबंदी, बरेलवी इ. वेगळेपणा तीव्रतेने जोपासू लागतो. त्यामुळे विविध मुस्लिम संघटना जरी एका फ्लॅटफार्मवर आल्या तरी आपले संघटन मजबूत होत नाही.
संघटन केवळ प्रचाराने कधीच होत नाही; केवळ आंदोलनातून निर्माण होत नाही. आज हिंदू संघटन ताकदवान कशामुळे होत आहे. याचा विचार करा.
- पहिले कारण, आज हिंदू विचाराचा भाजप सत्तेवर आहे.
- दुसरे कारण, हिंदू अस्मितेला जागवण्याचे काम काही व्यक्ती आणि संस्था पूर्ण ताकदीने करत आहेत.
- तिसरे कारण, इतिहासातील काही घटनांचा प्रचार (प्रपोगंडा) अनेक मार्गांनी केला जात आहे.
- चौथे कारण, गरीब कल्याणाचे जे कार्यक्रम सरकार राबवत आहे त्याचा मोठ्या खुबीने पक्षासाठी प्रचार केला जात आहे. हिंदुस्थानी मुसलमान नेहमीच आपल्या मस्लकच्या (शिया,सुन्नी, बरेलवी, देवबंदी तसेच जाती पाती) उलेमांच्या, राजकीय नेत्यांच्या आदेशांना शिरोधार्य मानत असतात. परंतु आज नेते फक्त आपल्या मस्लकचा किंवा फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार प्रामुख्याने करतात. त्यामुळे धर्मप्रेमी मुस्लिम त्यांच्यापासून दूर जात आहेत. समाजात पूर्ण मुस्लिम समाजाचा विचार करणारे नेते राहिले नाहीत. ज्यांच्यावर भरवसा ठेवावा असे नेते राहिले नाहीत. उलेमा आपल्या चाहत्यांना एकत्र करण्यालाच संघटन मानू लागले. अशा उलेमांच्या, राजकीय सामाजिक नेत्यांच्या अनेक संघटना आहेत. पण हे स्वार्थी नेते संपूर्ण मुस्लिम समाज आणि मुस्लिम धर्मासाठी एकाच उद्देशाने काम करत नाहीत. त्यांनी यासाठी एकत्र येऊन समान कार्यक्रम आखून एकवाक्यतेने तो राबवणे हाच उपाय आहे, त्या शिवाय तरणोपाय नाही.
झेन शम्स, सहारा रोजनामा २३.६.२२
Regards-:
Sanskrutik Vartapatra
1360,Shukrawar Peth,
Behind Sarswati Mandir Sanstha,
Natubaug,Pune-411046
Maharashtra
Ph-:020-24432515
Mob-:9604993715