क्रोध आणि भय परस्परसंबंध

SV    07-May-2022
Total Views |
   भय आणि क्रोध यांचे ब्राह्यस्वरूप परस्पर विरोधी भासले तरी दोन्ही दुर्बलतेची अपत्ये आहेत. झाकली जाणारी दुर्बलता म्हणजे क्रोध, आणि उघडी पडलेली दुर्बलता म्हणजे भय. आपल्याला जमत नाही. समजत नाही, समजावित येत नाही, उत्तर देता येत नाही, ही जाणीव मनात स्पष्ट झाली म्हणजे लोक रागावतात.  दुसऱ्याला  दोषी ठरवून,  ते स्वतःची अशक्तता आणि अयोग्यता लपवून ठेवतात. स्वतःची अगतिकता कबूल करण्याचेही बल त्यांच्या ठायी नसते. मग ते कधी अंगण वाकडे म्हणतात. म्हणूनच दुर्बल माणसे क्रोधी असतात आणि क्रोधी माणसे दुर्बल असतात. क्रोध माणसाला आक्रमणशील करतो, तर भीती त्याला पलायनशील बनविते. कोणी जबरदस्त प्रतिस्पर्धी भेटला  की भीती उत्पन्न होते. पण समोरचा मनुष्य दुर्बल आहे. अशी खात्री वाटली की क्रोध उत्पन्न होतो. क्रोध आला की डोळे लाल होतात. चेहराही लाल होतो. मुठी आवळल्या जातात. मनुष्य पुढे सरकतो. भीती वाटली की डोळे पांढरे होतात, चेहरा फिकट होतो. हातपाय ढीले होतात आणि मनुष्य मागे सरकतो. कधी तो पळून जातो, तर कधी जागच्या जागी मूर्च्छीत होतो.
- प्र. ग. सहस्त्रबुध्दे