भीतीच्या छायेत जगणे

SV    16-May-2022
Total Views |
       पाच पैकी चार राज्यात भाजप सरकार स्थापन झाले. हिंदू कट्टरवाद्यांची ताकद शिगेला पोहोचली. त्यांना वाटत आहे की, आम्ही आता काहीही करू शकतो. त्यांनी आता बेकायदेशीर कामे सुरु केली आहेत. उ. प्रदेशात निवडणूक जिंकल्यानंतर एका आमदाराने निवेदन प्रसिध्द केले की आता माझ्या मतदार संघात गोमांसाची (गोश्त) दुकाने दिसणार नाहीत. हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले की, मशिदीवरील लाउडस्पीकर हटवा नाहीतर आम्ही ते जबरदस्तीने हटवू. दिल्लीमधील दि. १८.३.२२ रोजी शुक्रवारची नमाज १६ मशिदीत बंद ठेवली. या मशिदी पुराण वस्तू खात्याच्या ताब्यात असून तेथे शुक्रवारची नमाज पढलीजाते. मामुली पोलिसाने कोठलीही लेखी सूचना नसताना इमामला भेटून सांगितले की, आज होळी आहे. नमाज बंद ठेवा. इमाम म्हणाले लेखी हुकुम दाखवा. त्याने सांगितले मी म्हणतो तसे झाले पाहिजे. पोलीस नमाज पढू देणार नाहीत. गेल्या ७० वर्षांतील हा पहिला प्रसंग आहे. हे देशाच्या राजधानीत घडले आहे. देशातील मुस्लिमांना असे वाटते की,  देशातील सर्वात जास्त जागरूक मुस्लिम दिल्लीत आहेत. आजपर्यंत दिल्लीतील कोणत्याही मुस्लिम सामाजिक संघटनेने किंवा धार्मिक संघटनेने या बद्दल तोंडसुध्दा उघडलेले नाही. मुस्लिम एवढे लाचार बनले आहेत की, मामुली शिपाईसुध्दा आम्हाला नमाज पढण्यापासून रोखत आहे. दिल्लीत आम्ही आमची मूल्यवान मते सेक्युलर पक्षाला दिली आणि सत्तेवर बसवले.
       मित्रानों (मेरे अझीझ दोस्तो) मी तुम्हाला  वारंवार सांगितले आहे की तुमच्या कमजोरीचा एकच इलाज आहे की तुम्ही राजकीय पक्ष काढा, तुमच्या झेंड्याच्या छायेत संघटीत व्हा. केवळ सेक्युलर पक्षांना संघटितपणे मतदान करून, विजयी करून हे होणार नाही. उ. प्रदेशात तुम्ही ज्या स.पाला भरभरून मते देऊन त्यांची झोळी भरलीत त्या पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी २० उमेदवार उभे केले आहेत त्यात १५ यादव आहेत आणि फक्त २ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. या पक्षाला मिळालेल्या एकूण मतात अर्ध्या पेक्षा जास्त मुस्लिम मते आहेत.
    अजून वेळ गेली नाही. भीती सोडा. कायदा सर्वश्रेष्ठ आहे खाकी कपड्यांना घाबरू नका. लोकशाहीत आपला आवाज बुलंद करा. अन्याय सहन करू नका. जुलूम सहन कराल तर गुलामी हेच तुमचे भविष्य आहे.
कलीम अल हफीज, मुं. उर्दू न्यूज २३.३.२२