
रा.स्व.संघाच्या 'केशव कुंज' या मुख्यालयात प्रांत प्रचारकांची तीन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात सरसंघचालक मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्ताजी होसबळे, अनेक वरिष्ठ नेते आणि साधारणपणे २५० प्रांत प्रचारकांचा सहभाग होता.
या बैठकीनंतर राष्ट्रीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, "रा.स्व.संघ हे वर्ष शताब्दी वर्ष साजरे करत असून वर्षभरात देशभरात १ लाख हिंदू संमेलने आयोजित केली जाणार आहेत. त्या निमित्ताने देशातील प्रत्येक गाव आणि घर येथे पोहोचण्याचे संघाचे उद्दिष्ट असेल" ते पुढे म्हणाले की, "संघाच्या रचनेनुसार ५८ हजार ९६४ मंडळे आणि ४४ हजार ५५ वस्त्या आहेत. प्रत्येक मंडळ आणि वस्त्यांमध्ये हिंदू संमेलन होईल. देशातील ११ हजार ३६० खंड आणि नगर यामध्ये सामाजिक सलोख्यासाठी बैठका होतील. देशातील ९२४ जिल्ह्यांमध्ये प्रमुख नागरिकांशी संवाद साधला जाईल. अशाप्रकारे संपर्क मोहीम राबवून देशाच्या अधिकाधिक घरांमध्ये संघाचे विचार पोहोचवले जातील.
सनातन प्रभात ९.७.२५.