पुण्यातील गुरुद्वारा कॅम्प परिसरातून हडपसरकडे चाललेल्या दिंडीमधील एका महिला वारकऱ्यावर नसीम शेख अब्दुल या महिलेने मांस फेकून मारले. २१ जूनला घडलेल्या या घटनेच्या वेळी याचा जाब विचारण्यास गेलेल्या वारकऱ्यांना नसीम हिने गलिच्छ शब्दांत शिवीगाळ केली आणि 'तुला काय करायचे, ते कर. मी कुणाला भीत नाही', असे बोलून धमकी दिली. दिंडीमधील वारकरी अक्कलवंत राठोड यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेचा अखिल भारतीय वारकरी संप्रदायाने जाहीर निषेध केला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 'वारकऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे', अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात येत आहे.
सनातन प्रभात २४/६/२५