मुंबईमध्ये विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांवरील १५०० भोंगे उतरवले

Vartapatra    05-Jul-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra anya72.jpg
 
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठिंबा आणि पोलिस दलाची इच्छाशक्ती यांच्या माध्यमातून मुंबईतील विविध धर्मांच्या १५०० प्रार्थना स्थळांवरील भोंगे मुंबई पोलिसांनी उतरवले आहेत. कसलाही गाजावाजा न करता पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली.
राज्यात काही काळापूर्वी मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण पेटले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर सरकारला हे भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, शहरातील विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांवरील १५०० वास्तूंवरचे भोंगे उतर्वले आहेत. विशेष म्हणजे यामुळे मुंबई शहर भोंगामुक्त झाले आहे.
राज्यासह देशात मंदिर, मशीद, गुरुद्वार, चर्च या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून सातत्याने वाद होत असताना मुंबई पोलिसांनी अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत शांततेत पडद्यामागे राहून मुंबई पोलिसांनी ही मोहीम राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज स्वतः याचा आढावा घेत होते. अडथळे निर्माण करणाऱ्यांशी फडणवीस स्वतः बोलत होते.
 
पुढारी २८/६/२५