नवी मुंबई येथील न्हावा शेवा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट 'द्वारे पाकिस्तानातून छुप्या पद्धतीने आलेला ९ कोटी रुपये किमतीचा माल जप्त केला. हा माल १ सहस्र ११५ मेट्रिक टन वजनाचा होता. या वेळी मालाचे ३९ कंटेनर पकडण्यात आले, तसेच एका आयातदार आस्थापनाच्या भागीदाराला अटक करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर केंद्रशासनाने पाकिस्तानातून थेट किंवा अप्रत्यक्ष मागनि येणाऱ्या मालाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली.
सनातन प्रभात २८/६/२५