पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानची सहा ड्रोन पाडली. या कारवाईत तीन पिस्तुले आणि सुमारे १.०७० किलो हेरॉईनही जप्त करण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
अमृतसरमधील मोढे गावाजवळ रात्री बीएसएफच्या जवानांनी पाच ड्रोन पाडले. या घटनास्थळी हाती घेण्यात आलेल्या शोधमोहिमेत चार पाकिटे मिळाली. त्यात असलेली तीन पिस्तुले, गोळ्या तसेच १ किलोहून अधिक वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. तसेच अटारी गावाजवळ आणखी एक ड्रोन पाडले.
लोकमत २५/७/२५