
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियामध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी तब्बल एक हजार वर्षे जुन्या मंदिराचा शोध लावला आहे. विशाल दगडांनी बांधलेले हे मंदिर एका दुर्गम डोंगराळ भागात सापडले असून ते प्रसिद्ध 'तिवानाकु' संस्कृतीच्या काळातील असल्याचे मानले जाते. या शोधामुळे या प्राचीन आणि रहस्यमय संस्कृतीच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'पलासपाटा' नावाच्या या पुरातत्व स्थळावर हे मंदिर सापडले आहे. हे ठिकाण पश्चिम बोलिव्हियातील टिटिकाका सरोवराजवळील एका उंच डोंगरावर आहे. अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे हे मंदिर हजारो वर्ष जगाच्या नजरेपासून लपून राहिलेले दिसते. प्रमुख संशोधक जोस कॅप्रिल्स यांनी सांगितले की, "हे केवळ मंदिर नसून एक व्यूहात्मक केंद्र होते." या मोठ्या मंदिरामुळे लोकांना विविध वस्तू आणि अन्नधान्य मिळवणे सोपे जात असे.तिवीनाकु संस्कृती इ.स. ४०० ते १००० च्या आसपास एक अत्यंत शक्तिशाली आणि संघटित संस्कृती होती.अनेक पिरॅमिड, मंदिरे आणि भव्य दगडी स्मारके उभारली यातील बहुतेक वास्तू टिटिकाका सरोवराच्या आसपास आहेत.
पुढारी २.७.२५.