देशातील अनोखी शिवमंदिरे
श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात शिवभक्त उपवास, पूजा, अभिषेक आणि मंत्रजप करून शंकराची आराधना करतात. त्यामुळे श्रावणाच्या सुरुवातीलाच आपण शंकराच्या काही अनोख्या मंदिरांबद्दल जाणून घेऊ, जी त्यांच्या रचनेमुळे, भौगोलिक स्थानामुळे किंवा त्यांच्याशी जोडलेल्या रहस्यमय कथांमुळे अनोखी तसेच अविश्वसनीय वाटतात.
मुरुडेश्वर मंदिर, कर्नाटक
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर भगवान शंकराच्या भव्य मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मूर्ती १२३ फूट उंच आहे, जी जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. हे मंदिर कंडुका टेकडीवर वसलेले असून त्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे. मंदिराचे प्रवेशद्वार (राजा गोपुरम) २० मजली असून लिफ्टच्या सहाय्याने सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते.
या मंदिराचा संबंध रावणाच्या कथेनुसार आहे. रावणाने अमरत्व मिळावे म्हणून भगवान शंकराकडून आत्मलिंग मिळवले होते. मात्र एका अटीनुसार ते जमिनीवर ठेवण्यास मनाई होती. देवांच्या युक्तीमुळे रावणाला हे लिंग याचं ठिकाणी जमिनीवर ठेवावे लागले आणि ते तिथेच स्थापित झाले.
पुढारी २५.७.२५.