
देशातील अनोखी शिवमंदिरे
श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात शिवभक्त उपवास, पूजा, अभिषेक आणि मंत्रजप करून शंकराची आराधना करतात. त्यामुळे श्रावणाच्या सुरुवातीलाच आपण शंकराच्या काही अनोख्या मंदिरांबद्दल जाणून घेऊ, जी त्यांच्या रचनेमुळे, भौगोलिक स्थानामुळे किंवा त्यांच्याशी जोडलेल्या रहस्यमय कथांमुळे अनोखी तसेच अविश्वसनीय वाटतात.
लेपाक्षी मंदिर (वीरभद्र मंदिर) आंध्र प्रदेश :हे मंदिर त्याच्या रहस्यमय 'हवेत तरंगणाऱ्या स्तंभासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आवारात एकूण ७० स्तंभ आहेत जे जमिनीला स्पर्श करत नाहीत. या स्तंभांखालून कापड किंवा ओढणी सहज आरपार काढता येते. मंदिराच्या जवळच एकाच दगडातून कोरलेली नंदीची मूर्ती आहे तसेच येथे सीतेच्या पायांचे ठसे असल्याचेही मानले जाते.
या मंदिराचा संबंध रामायणाशी जोडला जातो. रावणाने सीतेचे अपहरण करून नेत असताना जटायू पक्ष्याने त्याला अडवले, त्या दोघांच्या युद्धात जखमी होऊन जटायू याच ठिकाणी पडला होता. जेव्हा श्रीराम येथे पोहोचले तेव्हा त्यांनी 'ले पाक्षी' (उठ पक्ष्या) असे म्हटले म्हणून या जागेला 'लेपाक्षी' असे नाव पडले.
पुढारी २५.७.२५.