उत्तर प्रदेशातील आग्रा येथील धर्मांतर टोळीच्या तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. ही टोळी 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेशी संबंधित होती आणि त्यांच्याकडून मिळालेल्या निधीतून चालवली जात होती. तपास यंत्रणांच्या मते, 'लष्कर'शी संबंधित निधी युएई, कॅनडा, लंडन आणि अमेरिकेतून भारतात येत होता. या पैशांतून देशभरात मुलींचे धर्मांतर आणि ब्रेनवॉशिंगचे नेटवर्क उभारण्यात आले होते. धर्मांतरासाठी या टोळीला आर्थिक मदत करणारी गोव्यातील रहिवासी आयेशा ऊर्फ एस. बी. कृष्णा असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. आयेशा परदेशातून येणारा निधी देशभर वाटून देत असे. तपासात असे दिसून आले आहे की, कॅनडामध्ये बसलेला सय्यद दाऊद अहमद थेट भारतातील आयेशाच्या खात्यात निधी पाठवायचा. आयेशाचा पती शेखर राय ऊर्फ हसन अली कोलकाता येथून काम करत होता. तो टोळीचा कायदेशीर सल्लागारही होता. त्यालाही अटक करण्यात आली आहे. तो धर्मातराशी संबंधित कायदेशीर कागदपत्रे तयार करण्याची आणि कागदपत्रे पूर्ण करण्याची जबाबदारी सांभाळत होता.
आग्र्याचा रहिवासी अब्दुल रहमान कुरेशी हा या नेटवर्कचा सर्वांत धोकादायक चेहरा होता. कुरेशी हा युट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलींचे ब्रेनवॉशिंग करायचा. इस्लामिक शिक्षणाच्या नावाखाली तो मुलींना कट्टरतावादाकडे घेऊन जायचा आणि नंतर त्यांना जिहादी विचारसरणीशी जोडायचा.
'इसिस'च्या धर्तीवर यंत्रणाब्रेनवॉश केलेल्या मुलींना प्रथम दिल्लीला आणले जायचे आणि नंतर बसने आग्रा येथे नेले जायचे. स्थान शोधले जाण्याचा धोका असल्याने ट्रेनचा वापर केला जात नव्हता. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुलींना उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये पाठवले जायचे. संपूर्ण टोळीचे कामकाज 'इसिस'च्या धर्तीवर चालवले जात होते. या नेटवर्कद्वारे 'लव्ह जिहाद' आणि धर्मांतराचे नेटवर्क देशभर पसरवले जात असल्याचा दावा एजन्सींचा आहे. तपास यंत्रणा आता या नेटवर्कच्या प्रत्येक लिंकची चौकशी करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?वृत्तानुसार, ही घटना आग्रा येथील सदर पोलीस स्थानक परिसरातून सुरू होते, जिथे पंजाबी समाजातील दोन सख्ख्या बहिणी राहात होत्या. दि. २४ मार्च रोजी त्या अचानक त्यांच्या घरातून गायब झाल्या. कुटुंबातील सदस्यांनी आधी त्यांचा शोध घेतला, परंतु त्यांना कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दि. ४ मे रोजी सदर पोलीस ठाण्यात अपहरण कलमांतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला. कुटुंबीयांनी आरोप केला की, त्यांच्या मुलींना जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील रहिवासी सायमा ऊर्फ खुशबू नावाच्या तरुणीने आमिष दाखवून पळवून नेले. पोलिसांच्या तपासात हा केवळ अपहरणाचा प्रकार नसून तो एका मोठ्या धमांतर टोळीचा भाग होता, असे समोर आले. या बहिणींचे ब्रेनवॉश करून धर्मातर करण्यात आले होते आणि आता त्या स्वतः या टोळीचा भाग बनल्या आहेत.
मुंतभा २१/७/२५