त्या अज्ञात बंदुकधाऱ्यांना कोण वाचवणार ?

Vartapatra    27-Jul-2025
Total Views |

sanskrutik vartapatra_Anya_92.jpg
 
पाकिस्तानपासून कॅनडापर्यंत अज्ञात बंदुकधाऱ्यांनी दहशत निर्माण केली आहे. अनेक इस्लामिक आतंकवादी व खलिस्तानी अज्ञात बंदुकधाऱ्यांचे शिकार बनले आहेत. भारताच्या शत्रूंना वेचून वेचून ठार मारले जात आहेत.त्यांना कोण मारत आहे हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा अज्ञात बंदुकधाऱ्यांच्या सुरक्षिततेची प्रत्येक भारतीय प्रार्थना करत असेल आणि त्यांचे आभारही मानत असेल. परंतु भारतीयांना याची जाणीव आहे का ; की या अज्ञात बंदुकधाऱ्यांच्या आयुष्याची दोरी आपल्या हातात आहे ते ? जर कॉंग्रेस किंवा त्यांच्या विचाराचा कोणताही पक्ष सत्तेत आला तर या अज्ञात बंदुकधाऱ्यांची संपूर्ण यादी पाकिस्तानच्या हातात सोपवली जाईल. ते कोण आहेत व कुठे असतात याची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मग या अज्ञात बंदुकधाऱ्यांची तशीच हत्या होईल जशी यापूर्वीही अनेकवेळा झालेली आहे.
 
भारतीय गुप्तहेर संघटना ‘रॉ’ चे माजी अधिकारी आर.के.यादव हे (Mission R&AW)‘मिशन आर अॅण्ड ए डब्ल्यू’ या आपल्या पुस्तकात लिहितात की, ‘हामिद अन्सारी हे वर्ष १९९० ते १९९२ अशी दोन वर्षे इराणमध्ये भारताचे राजदूत होते. त्या काळात तेथे काम करणाऱ्या भारतीय हेरांवर आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर अक्षरशः संकट कोसळले. काहींचे अपहरण करण्यात आले तर काहींची हत्या करण्यात आली. भारतीय गुप्तहेर यंत्रणेचे जाळेच अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले.
 
काँग्रेसच्या पाठिंब्यावर १९९७ मध्ये भारताचे पंतप्रधान झालेले इंद्रकुमार गुजराल यांनी तर भारताच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. त्यांनी पाकिस्तानातील सिंध व बलुचिस्तानात सक्रिय असलेल्या ‘रॉ’ च्या हेरांची यादीच आयएसआय अधिकाऱ्यांच्या हातात दिली होती. असे सांगितले जाते की, पुढील १० ते १५ दिवसात या सर्व खबरींना व हेरांना ठार मारण्यात आले. गुजराल यांनी ही देशद्रोही कृत्यं लपूनछपून नाही तर उघड उघड केली होती.
 
सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांचे सरकार २००४ मध्ये झाल्यावर रॉ आणि इंटिलीजन्स ब्युरोच्या मनोबलाचे पूर्णपणे खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली. त्यांचे पाकिस्तानात तयार करण्यात आलेले गुप्तहेरांचे जाळेच नष्ट करण्यात आले. भारताच्या तुरुंगात, कैदेत असलेले आयएसआयच्या हस्तकांना सद्भावनेच्या नावावर सोडून देण्यात आले. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर २०१० मध्ये २५ पाकिस्तानी अतिरेकी व आयएसआय हस्तकांना ‘गुडविल मिशन’ च्या नावावर सोडून देण्यात आले. त्यात शाहीद लतीफ हा अतिरेकी पण होता, ज्याने नंतर पठाणकोट एअरबेसवर आतंकवादी हल्ला केला होता.
 
हजारो वर्षांची संस्कृती असलेल्या आपल्या देशाची सर्वात मोठी कमजोरी काय आहे, तर इतिहासाचे अज्ञान आणि शत्रूबोधाची जाणीव. आम्ही इतिहासातून काहीही शिकत नाही आणि क्षुद्र स्वार्थासाठी शत्रूच्या वळचणीला जाऊन बसतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जे कोणतीही ओळख न देता, कोणत्याही श्रेयाची अपेक्षा न ठेवता, सतत आपला जीव धोक्यात घालून आपले रक्षण करतात त्यांचे आयुष्य आपल्या मतावर अवलंबून आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे.
 
Indix online 22.11.2023
Reference: https://youtu.be/IdjgubI3HXU?si=LtFNhUR4V9v9lFr3