अमेरिकेत खलिस्तानी नेटवर्कवर 'एफबीआय'चा प्रहार

Vartapatra    24-Jul-2025
Total Views |
sanskrutik vartapatra antarrashtriya_4.jpg
 
भारतातून फरार झालेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचा अमेरिकी गुप्तचर संस्था 'एफबीआय'ने कारवाईचा फास आवळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'एफबीआय' आणि स्थानिक एजन्सींनी कॅलिफोर्नियातील सॅन जोक्विन काऊंटीमध्ये मोठी कारवाई केली.

स्टॉकटन, मँटेका आणि स्टॅनिस्लॉस काऊंटीच्या स्वॅट टीम्स, 'एफबीआय'च्या विशेष युनिटच्या मदतीने झालेल्या या ऑपरेशनमध्ये भारतीय वंशाच्या आठ खलिस्तान समर्थक गुंडांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खलिस्तानी नेटवर्कवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खलिस्तान समर्थक दिलप्रीत सिंग, अर्शप्रीत सिंग, अमृतपाल सिंग, विशाल, पवित्र सिंग ऊर्फ पवित्र बटाला, गुरताज सिंग, मनप्रीत रंधावा आणि सरबजीत सिंग यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध वेगवेगळे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर अपहरण, छळ, बेकायदेशीर कैद, गुन्हेगारी कट रचणे, साक्षीदारांना धमकावणे, सेमी ऑटोमॅटिक शस्त्राने हल्ला करणे, दहशत पसरवण्याची धमकी देणे, गँग कायद्यांतर्गत गुन्हे, मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे बाळगणे, मशीन गन आणि असॉल्ट रायफल बाळगणे, शॉर्ट-बॅरल रायफल बनवणे आणि अवैध मॅगझिन विकणे यांसारखे गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांना अमेरिकेतील तुरुंगात हलवण्यात आले आहे.

मुंबई तरुण भारत १४/७/२५