भारतीय मजदूर संघाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी असणारे तसेच असंतोषाचे जनक मानले जाणारे लोकमान्य टिळक यांच्या जन्मदिनी म्हणजे २३ जुलै रोजी आणि १९५५ साली भोपाळ येथे थोर विचारवंत अर्थतज्ञ दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रेरणेतून भारतीय मजदूर संघ स्थापन झाला.
राष्ट्रहित, उद्योग हित आणि कामगार हित ही त्रिसूत्री तत्व मार्गदर्शक ठरवून भारतीय मजदूर संघाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. 'श्रमिक हेच राष्ट्र्निर्माते' ही संघटनेची विचारसरणी आहे. ही संघटना संघर्षवादी पण संवादवादी संघटना आहे. केवळ मागण्या मांडणे हा तिचा उद्देश नसून कामगारांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणे हेच तिचे खरे ध्येय आहे.
म.टा.२३.७.२५.