वाडीमय झाले आदिवासी शेतकरी बांधव.

Vartapatra    22-Jul-2025
Total Views |

sanskrutik vartapatra krushi_56.jpg
 
शेतकऱ्याऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे स्थलांतर कसे थांबेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न श्रीगुरुजी रुग्णालय नाशिक संचलित 'सेवा संकल्प समिती' करत आहे. यंदा समितीमार्फत ३३० शेतकऱ्यांना वाडी प्रकल्प देण्यात आला आहे. जुलै २०२२ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी ५० शेतकरी, दुसऱ्या वर्षी १२०, तिसऱ्या वर्षी २०८ आणि चौथ्या वर्षी म्हणजे या वर्षी ३३० शेतकऱ्यांना वाडी प्रकल्प दिला आहे. या चार वर्षांत एकूण पपई आणि पेरूचे प्रत्येकी ६००, आवळा एक हजार, ०४५, फणस दोन हजार, ६९५, लिंबू तीन हजार, ५४५, तर आंबा २७ हजार, ८१५ अशी फळझाडे तर चांगले उत्पादन देणाऱ्या बांबूची १९ हजार, ६०५ झाडे लावण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत या सगळ्या झाडांपासून उत्पन्न यायला सुरुवात होणार आहे.

आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'सहेली सेवा मंडळा'च्यावतीने हिवाळी येथे श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली आणि बोरपाडा येथे श्री विठ्ठल-रखुमाई यांची महाआरती व पूजा ग्रामस्थ तसेच, हितचिंतक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यंदा नाशिकमधील अनेक कुटुंबीयांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. यंदा ३३० शेतकऱ्यांना वाडीत ५० केशर आंबा, पाच फणस व पाच लिंबू दिले. तसेच, सप्टेंबरमध्ये प्रत्येकाला २० शेवगा देण्यात येणार आहेत.

वांगणपाडा येथे 'विनजित टेक्नोलॉजी प्रा. लि. या कंपनीच्या सीएसआर देणगीतून लागवड करण्यात आली. या प्रकल्पाला आतापर्यंत त्या फिलोथेरोपी, रिलायबल ऑटोटेक यांचे, तर यंदा रिलायबल ऑटोटेक सोबत 'क्निजित टेक्नोलॉजी प्रा. लि.' यांचे सीएसआर देणगी साहाय्य लाभले आहे. यंदा वाडीच्या प्रत्येक झाडाला क्यूआर कोड लावून त्याचे ट्रेकिंग केले जाणार आहे. एक हजार, ८६० आंब्याच्या झाडांवर हा प्रयोग केला जाईल, अशी माहिती 'विनजीत कंपनी' चे मकरंद सावरकर आणि संजय बारसे यांनी दिली.

अतिदुर्गम ८४ पाड्यांवर सेवाकार्य

वाडी प्रकल्प म्हणजे आदिवासी भागांमध्ये फळबाग लागवड आणि शाश्वत उपजीविका वाढवण्यासाठी राबवण्यात येणारा एक उपक्रम आहे. हा प्रकल्प आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनीस फळझाडे लावून उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतो. गुरुजी रुग्णालय नाशिक संचलित 'सेवा संकल्प समिती गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि अंतर तालुक्यातील अतिदुर्गम अशा ८४ पाडयांवर सेवाकार्य करत आहे. अत्यंत गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत १०९ शेतकऱ्यांना वाडी देऊन प्रकल्पाद्वारे फळझाडांची लागवड करण्यात आली. अधिक माहितीसाठी मिलिंद जोशी (७७०९६१८८३३) यांच्याशी संपर्क साधावा.

मुं.त.भा. १४/७/२५