सांगलीतील 'इस्लामपूर' चे नाव आता 'ईश्वरपूर' होणार !

Vartapatra    21-Jul-2025
Total Views |
 
Sanskrutik Vartapatra_Anya_85 (1).jpg
 
नुकतीच राज्यशासनाने सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे 'ईश्वरपूर' असे नामांतर करण्याची घोषणा केली. शासन यासंबंधीचा प्रस्ताव शिफारसींसह केंद्र शासनाकडे सादर करणार आहे. योग्य सोपस्कार पार पडल्यानंतर 'इस्लामपूर' ला 'ईश्वरपूर' हे नाव मिळेल अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे अशी मागणी ४-५ दशकांपूर्वी केली होती. १९८६ मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती, त्यात त्यांनीदेखील या नावाचा उल्लेख केला होता. तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील ही मागणी केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर होताना दिसते आहे. अधिकृत बदलानंतर ईश्वरपूर नगर परिषद,ईश्वरपूर विधानसभा मतदार संघ यांसह सर्वच स्तरांवर हे नाव बदलण्यात येईल.

सनातन प्रभात १८.७.२५.