अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर मंदिरातील १६७ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले, त्यातील ११४ कर्मचारी मुसलमान होते. मंदिराच्या पवित्र कठड्यावर मुसलमान कर्मचारी काम करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. म्हणून हिंदू संघटनांनी त्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. म्हणून मंदिर ट्रस्टने, हे कर्मचारी बेशिस्त वागत होते आणि अनेक महिने कामावर ही येत नव्हते, असे कारण देत त्यांच्यावर कारवाई केली.
एका हिंदूसाठी मंदिर ही केवळ एक वास्तू नाही तर ते भगवंताचे घर असते. तेथील प्रत्येक गोष्ट मग ते पूजा अर्चा असेल, तेथील रितीभाती असतील त्या तेथील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी असतात. जर एखादा गैरहिंदू गोमांस भक्षण करून मंदिरात आला तर त्याने तेथील सात्विक वातावरण नष्ट होईल. जो गैर हिंदू, हिंदूंच्या नियमांचे पालन करीत नाही, तो जर मंदिरातील कार्यात सहभागी झाला तर त्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला धक्का पोहचू शकतो.
दै. जागरण १६.६.२५