अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू,बौद्ध,शीख धर्मातील समाजबांधवानाच मिळू शकतो, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला आहे. त्यामुळे अन्य धर्मात धर्मांतर केलेल्या व्यक्तींचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.त्यामुळे धर्मांतरित झालेले असताना SC आरक्षणाच्या आधारे मिळणारे सर्व लाभ संपुष्टात येणार आहे.
धर्मांतरित झालेले किंवा आधीपासून वेगळ्या धर्माचे असलेले परंतु SC आरक्षणाच्या लाभ घेत असलेल्या व्यक्तींकडून फसवणूक केल्या प्रकरणी वसुली केली जाईल तसेच फसवणूक करून, प्रलोभन देऊन कोणी धर्मांतर करत असेल तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. क्रिप्टो ख्रिश्चन झालेल्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल.
VSK देवगिरी,१८.७.२५