कर्णावती (गुजरात) गुजरातमध्ये रहाणाऱ्या २५० बांगलादेशी घुसखोरांना २ जुलै या दिवशी सीमापार करण्यात आले. या घुसखोरांना भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने वायूदलाच्या वडोदा तळावरून ढाका (बांगलादेश) येथे पाठवण्यात आले. कडक सुरक्षेत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांनी ही कारवाई केली. कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी सर्व घुसखोरांचे हात बांधण्यात आले होते.
या बांगलादेशी घुसखोरांना कर्णावती, सुरत, वडोदरा आणि राजकोट यांसारख्या वेगवेगळ्या शहरांमधून पोलिसांच्या देखरेखीखाली बसमधून आणण्यात आले. गेल्या २ महिन्यांत १ सहस्र २०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यात ले आहे. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांची पडताळणी करून पोलीस त्यांची ओळख पटवत आहेत.
मोहीम आणखी तीव्र करणार !अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये घुसखोरांवर लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद हालचालींविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
सनातन प्रभात ६/७/२५