प्राचीन,मध्ययुगीन,ऐतिहासिक,सामरिक,सांस्कृतिक आणि स्थापत्यशैली या बलस्थानामुळे किल्ले शिवनेरीवर युनेस्कोची मोहोर उमटली.
जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असून तत्कालीन सातवाहन कालखंडामध्ये जुन्नर ही सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. जुन्नर,नाणेघाट,कोकणातील चौल बंदर या सातवाहनकालातील राजमार्गावर शिवनेरी हे महत्त्वाचे ठाणे होते. त्यामुळे जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे स्थान महात्म्य मोठे होते. सातवाहन राज्यकर्त्यांनी बौध्द भिक्खुंसाठी विहार, स्तूप अशा रचना असलेल्या बुद्ध लेणी किल्ले शिवनेरीवर कोरल्या गेल्या होत्या. बहामनी राजवट,निजामशाही,मुघल काळात आणि शिवकाळात तसेच ब्रिटिशकाळात शिवनेरीचे महत्व अबाधित होते.
अनेक ऐतिहासिक घटनांचा शिवनेरी किल्ला साक्ष आहे. सन १६३० मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म तसेच १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावरूनच करण्यात आली होती.
लोकमत १५.७.२५.