ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी करणार्या म्हसवड येथील सविता दत्तात्रय जाधव यांच्या विरोधात म्हसवड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविता जाधव यांनी ‘हिंदू धर्म खोटा आहे, तुमच्या घरातील सर्व देवतांची चित्रे, मूर्ती काढून टाका. तुमच्या हिंदू धर्मातील देवतांची पूजा करू नका. हिंदू देवतांची पूजा केल्यामुळे तुमचे वाटोळेच होणार आहे. तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारा, येशूची प्रार्थना करा’, असे सांगितले. यावर धनाजी माने यांच्याशी सविता जाधव यांचा वाद झाला. शेवटी धनाजी माने यांनी धार्मिक भावना दुखावल्याविषयी म्हसवड पोलिसात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य पहाता म्हसवड पोलिसांनी सविता जाधव यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला.
सनातन प्रभात ६/७/२५