माहीत असावं असं काही

Vartapatra    12-Jul-2025
Total Views |
 
Saanskrutik Vartapatra_Anya_77.jpg
 
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार ; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार !

९ जुलै २०२५ हा दिवस सामान्य दिवसांपेक्षा १.३ ते १.५१ मिलिसेकंद आधी संपला. हा इतिहासातील सर्वात लहान दिवस मानला जाऊ शकतो. यापूर्वी ५ जुलै २०२४ या दिवशी पृथ्वीने आपले परिभ्रमण १.६६ मिलिसेकंद आधी पूर्ण केले होते. पृथ्वी २४ तासांत एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करते. आय.ई.आर.एस या संस्थेनुसार (ही संस्था जागतिक वेळ मापनाचे निरीक्षण करते) २२ जुलै आणि ५ ऑगस्ट हे दिवस सामान्य दिवसांपेक्षा १.३ ते १.५१ मिलिसेकंद कमी असू शकतात. चंद्र पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम करत आहे, तो पृथ्वीला थोडे वेगाने फिरवत आहे.
 
 
पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग नेहमीच सारखा नसतो. सूर्य आणि चंद्राची स्थिती,पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल,पृथ्वीच्या आत आणि बाहेरील वस्तुमानाचे असमान, ज्यामध्ये बर्फ वितळणे,समुद्राच्या पातळीत बदल अशा गोष्टी त्यावर परिणाम करतात.

लोकमत १०.७.२५.