सांडपाणी शेतीयोग्य करणारी गाळण यंत्रणा विकसित

Vartapatra    01-Jul-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra krushi_54
 
पाण्याच्या उपलब्धतेचे संकट वाढतच जाणार आहे, त्यावर मार्ग काढण्यासाठी सांगलीत शिकणाऱ्या पाच मुलांनी नावीन्यपूर्ण उपाय शोधला आहे. आज वाया जाणाऱ्या घरगुती सांडपाण्याचे शुद्धीकरण करून वे. शेतीसाठी पुन्हा वापरता येईल, अशी कल्पना त्यांनी कृतीत उतरवली आहे. 'ग्रे वॉटर व्यवस्थापन प्रणाली' या नावाने त्यांनी तयार केलेला हा प्रकल्प पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या कृषी हॅकथॉनमध्ये मांडण्यात आला होता.

आज शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी मोठे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी शहरी सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोतही प्रदूषित होत आहेत. या दोन्ही समस्या मिटविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील आद्यधामधील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्न आणि अभियांत्रिकीच्या शाखेतील सबाद बिडीवाला, सारांश जाजू, शिवम वाघमोडे, मोहम्मद सय्यद, अक्षिता झा या पाच विद्याथ्यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प घरासाठी, छोट्या मोठ्या गृहनिर्माण संस्थेसाठी फायदेशीर ठरू शकदी. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे रोहन वाघमारे महणाले,

"सांडपाण्याचा पीएच ८.९ आणि टीडीएस चार हजार ५०० पर्यंत असतो. त्यामुळे ते पाणी कोणत्याही वापरासाठी थेट उपयुक्त ठरत नाही. मात्र, आमच्या प्रणालीच्या माध्यमातून तेच पाणी आम्ही पीएच साठ आणि टीडीएस जवळपास २५० पर्यंत नियंत्रित करू शकतो, जे शेतीसाठी किंवा घरगुती पुनर्वापरासाठी योग्य ठरते. या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय थांबेल."

सिंचन नगर कृषी महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या कृषी हकेथॉनमध्ये 'ग्रे वॉटर व्यवस्थापन प्रणाली' या प्रकल्पाची माहिती देताना अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी.

ग्रे वॉटर म्हणजे काय?
ग्रे वॉटर म्हणजे स्वयंपाकघर, स्नानगृह, हात धुणे अशा घरातील कामांमधून निर्माण होणारे सांडपाणी. हे पाणी थेट वापरण्यास योग्य नसले तरी त्याचे योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्वापर करणे शक्य आहे. याच संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी सात स्वरांची शुद्धीकरण प्रक्रिया विकसित केली आहे.

विद्यार्थी म्हणतात
एका घरातून दररोज साधारण ४०० लिटर सांडपाणी तयार होते जर एका संपूर्ण गावाचा किंवा इमारतीचा विचार केला तर अधिक सांडपाणी तयार होऊ शकते. त्यापैकी सुमारे ७० ते ८० टक्के पाणी पुन्हा वापरता येऊ शकते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआप) तंत्रज्ञानाचा वापर करून एक विश्लेषणात्मक प्रणाली तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी जाती त्यांच्या पिकाचा प्रकार आणि शेताचे क्षेत्रफळ दिल्यास त्या पिकाला आवश्यक असणारे पाण्याचे प्रमाण एआय प्रणालीद्वारे सुचवले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न होता नियोजनाद्वारे पाण्याचा वापर करता येतो.

ऍग्रोवन ११/६/२५