उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील गंगानगर परिसरातून अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करून तिला केरळमध्ये नेण्यात आले. तिथे तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला जिहादी आतंकवादी बनवण्याचा कट होता. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्या मुलीला सोडवले. तेव्हा त्या मुलीने सांगितले की, या टोळीमध्ये अनेक मुलींना सहभागी करून घेण्यात आले आहे. उत्तरप्रदेश व्यतिरिक्त इतर राज्यांतील मुलीही या टोळीत आहेत.
या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार करताना म्हटले की, ८ मे या दिवशी १९ वर्षीय दरकशा बानो नावाच्या मुलीने त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला धर्मांतरासाठी फूस लावून नेले. तिला बानो हिने देहलीमार्गे केरळला नेले. तिथे तिला पैशाचे आमिष दाखवून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि तिच्यावर जिहादी होण्यासाठी दबाव आणला. तेव्हा ती तिथून पळून गेली आणि रेल्वे स्थानकावर पोहोचली. तेथील पोलिसांनी तिची माहिती घेतली आणि नंतर तिच्या कुटुंबीयांना कळवले.
सनातन प्रभात